Social Media News

Social Media News
Social media News

Wednesday, June 29, 2016

टर्की मधल्या भारतीयांसाठी इर्मजन्सी नंबर

नवी दिल्ली, दि. २९ - तीन दहशतवाद्यांनी मंगळवारी इस्तंबुलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ३६ जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक टर्कीश नागरीक असले तरी, काही परदेशी नागरीकही आहेत असे अधिका-याने सांगितले. 
 
या हल्ल्यात अद्यापपर्यंत तरी कोणी भारतीय जखमी झाल्याचे वृत्त आलेले नाही. टर्कीमधील भारतीयांना तात्काळ कोणतीही मदत हवी असल्यास भारत सरकारने इर्मजन्सी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. 
कुठल्याही भारतीयाला मदत हवी असल्यास तो या क्रमांकवर फोन करु शकतो. 
+90-530-5671095/8258037/4123625

गोमूत्रामध्ये सापडले सोन्याचे अंश

अहमदाबाद, दि. २९ - गुजरातमधील जुनागड कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गायीच्या मूत्रामध्ये सोन्याचे अंश सापडल्याचा दावा केला आहे. गीर प्रजातीच्या गोमूत्रामध्ये त्यांना सोन्याचे अंश आढळून आले आहेत. डॉ.बी.ए.गोलाकीया यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणा-या टीमने गोमूत्राच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी जीसी-एमएस पद्धतीचा अवलंब केला. 
 
गोलकीया जेएयू बायोटेक्नोलॉजी खात्याचे प्रमुख आहेत. ५०० नमुन्याच्या तपासणीमध्ये प्रत्येक लिटर मागे १० ते ३० मिलीग्रामपर्यंत सोन्याचे अंश सापडले असा दावा डॉ. गोलाकीया यांनी एएनआयशी बोलताना केला. जेएयूची स्वत:ची प्रयोगशाळा असून, मागच्या सात वर्षांपासून त्यांचे गोमूत्रावर संशोधन सुरु आहे. 
 
 गोमूत्राचे ५०० पेक्षा अधिक नमूने गोळा करुन त्यावर संशोधन करण्यात आले. प्रतिलिटर यूरीनमध्ये १० ते ३० मिलीग्रामपर्यंत सोन्याचे अंश असल्याचे त्यांनी सांगितले. गायीच्या वयानुसार सोन्याचे जे अंश मिळतात त्यात फरक असतो. पण सर्व नमुन्यांमध्ये सोने सापडले असे डॉ. गोलाकीया यांनी सांगितले.

रात्रभर जीवाची मुंबई करण्याचा मार्ग मोकळा

केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( दुकाने आणि आस्थापना) कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणा-या सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाइफ अनुभवता येऊ शकते. कारण उच्चभ्रूंसाठी नाइटलाइफ नवीन नाही, त्यांचा दिवस रात्रीच सुरु होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल्स, दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्रीमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस) कायद्याला मंजुरी दिल्याने  रेस्टॉरंट्स्, दुकानेस बँका, मॉल्स, आयटी फर्म्स इत्यादी वर्षभर दिवसरात्र त्यांच्या सोयीनुसार  सुरू राहू शकतात. दरम्यान या कायद्यानुसार महिलांनाही पुरशा सुरक्षा व्यवस्थेच्या सहाय्याने रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहे आदि सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

इस्तंबूल विमानतळावर हल्ला; ३६ ठार १५० जखमी


तुर्कीची राजधानी इस्तंबुल शहरातील आतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला आहे. एकामागोमाग एक झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ३६ जण ठार झाले असून १५० जखमी झाले आहेत. या हल्ल्यात 'इस्लामिक स्टेट' (आयएस)चा हात असल्याचा संशय आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी इस्तंबूल विमानतळावर घुसले होते. त्यांनी विमानतळावर अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करताच त्यांनी स्वत:लाही उडवून दिले.


विमानतळ टर्मिनलच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांची कडेकोट सुरक्षा असते. त्यांना चकवा देत दहशतवाद्यांनी विमानतळाच्या इमारतीत प्रवेश केला. हल्ल्यानंतर काही वेळेतच ३० रुग्णवाहिका विमानतळावर दाखल झाल्या आहेत. जखमींमध्ये अनेक पोलिसांचाही समावेश असून त्यांना बकिरके स्टेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

काही महिन्यांपासून कुर्द आणि 'इस्लामिक स्टेट'च्या दहशवाद्यांनी तुर्कीला लक्ष्य केले असून अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. इस्तंबूलला भेट देणारे पर्यटकही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळं पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण असून बहुतांशी पर्यटनावर अवलंबून असलेल्या तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.